Skip to main content
x

Sri Swamiji's Kolhapur Visit - Marathi

! श्री हरी वायु गूरूभ्यो नमः !!

श्रीमन् मध्वाचार्य मूलमहा संस्थान, श्री ह्रषीकेश तीर्थ साक्षात परंपरेचे श्री पलीमारू मठ, याचे प्रस्तुत पीठाधिपती श्री श्री विद्याधीशतीर्थ यांचा उडुपी येथे पुढील वर्षीपासून पर्याय सुरू होणार आहे. त्यानिमित्त श्री स्वामीजी दिग्वीजय संचार करीत कोल्हापूर येथे दि. 15, 16 व 17/09/2017 (दशमी, एकादशी, द्वादशी) रोजी येणार आहेत.

त्यांचा कार्यक्रम:
दि. 15/09/17 रोजी सायं. 5:30 वा. श्री राघवेंद्र स्वामी मठ येथे आगमन. सायंपूजा.

दि. 16/09/17 (एकादशी) रोजी सकाळी श्री संस्थान पूजा व तीर्थ.
दु. 12:30 वा. प्रवचन.
सायं. 7:00 वा. श्री उत्तरादी मठ, कोल्हापूर येथे प्रवचन.

दि. 17/09/17 रोजी श्री राघवेंद्र स्वामी मठ, येथे स. 5:00 वा. संस्थान पूजा व तीर्थ प्रसाद. नंतर सामूहिक पादपूजा. नंतर घरोघरी पादपूजा.

तरी सर्व सद्भक्तांनी या सुवर्णसंधीचा लाभ घेवून श्री स्वामीजी व श्री रामाच्या दिव्य अनुग्रहास पात्र व्हावे ही नम्र प्रार्थना. 🙏🏻
पादपूजा व इतर माहिती याची विचारणा व नोंदणी साठी श्रीराघवेंद्र स्वामी मठ किंवा श्री उत्तरादी मठ, कोल्हापूर येथे संपर्क साधावा ही प्रार्थना.

मा. दिवाणरू,
श्री पलिमारू मठ, उडूपी.